ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई.

प्रकाशन: 20 Feb 2023 06:08 PM
वाचन संख्या 48

ब्यूरो चिफ/ विवेक परब-भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डाॅ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली, या वेळी सदर स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणाऱ्या समस्यां वर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांतजी भारतीय यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे पाठपुरावा करून लवकरात लवकर गांधी स्मारक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले. या संदर्भात शिरोडा ग्रामपंचायतने केलेला प्रस्ताव व आता पर्यंतचा झालेला पाठपुरावा बाबत माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी जि प सदस्य प्रीतेशजी राऊळ, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान ग्रा. पं. सदस्य मयुरेश शिरोडकर यांनी माहिती दिली. या वेळी डाॅ.अमेय देसाई यांनी स्मारक संदर्भात कमिटी बनवून मंत्रालयामध्ये जी काय मदत लागेल ती देण्याची आपली तयारी आहे असे आश्वासन दिले.या वेळी भाजप, सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत विद्यमान सदस्या कु.अर्चना नाईक, सौ.हेतल गावडे, भाजप रेडी, शिरोडा, आरवली शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे जगन्नाथ राणे, विदयाधर धानजी, महादेव नाईक, भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, भाजप शिरोडा शहर भाजप पदाधिकारी विकास परब,जितेद्र आजगांवकर व भाजप पदाधिकारी व सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स