ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 20 Feb 2023 06:02 PM
वाचन संख्या 46

महिला विभाग प्रमुख सौ. अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शुभारंभ

ब्यूरो चिफ-विवेक परब- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या औचित्यावर मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गांवकर, भारती परब, मिताली कोरगांवकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर, सुवर्णलता पांगे, सुनीता गांवकर, गीता गांवकर विभाग प्रमुख समिर लब्दे,विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गांवकरआदी उपस्थित होते.यावेळेस शिवरायांना घडवणारी आई जिजाऊबाई यांचे विचार कार्यक्रमाला उपस्थित असलेलेविद्यानंद परब यांनी मांडले. तसेच महिला एकत्र येऊन त्यांच्यामधील एकोपा वाढण्यासाठी गेली चार वर्ष आमदार वैभव नाईक आचरे विभागात हळदीकुंकू समारंभ घेण्याच्या संकल्पने बद्दल महिला वर्गातून आमदार नाईक यांना धन्यवाद दिले जात आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स