ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरसंघचालक मोहन भागवत हे मशिदीत गेले ते काय शोधून आले…?; शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

सरसंघचालक मोहन भागवत हे मशिदीत गेले ते काय शोधून आले…?; शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

प्रकाशन: 14 Feb 2023 06:25 PM
वाचन संख्या 77

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाज बुबेरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश ; शिवसेना भवन मुंबई येथे पूर्व मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बांधले शिवबंधन.

मालवण | सुयोग पंडित : देशातील व राज्यातील प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ आहेत. दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली गेली आहे. एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत तत्वात बसते? म्हणजेच काय तर आम्ही वाटेल ते करू परंतु तुम्ही आवाज उठवायचा नाही आवाज उठवला तर चिरडून टाकू हि एक पाशवी वृत्ती आपल्या देशात फोफावायला बघतेय आपण वेळेमध्ये एकत्र आलो नाही, आपली ताकद वाढविली नाही तर पुरा देश खावून टाकेल असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते व शिवसेना नेते सुभाष देसाई , खासदार अरविंद सावंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाज बुबेरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना भवन मुंबई येथे उद्धवजी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील,रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यासंह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

उद्धवजी ठाकरे पुढे म्हणाले, गेले पाच सहा महिने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष प्रवेशासाठी,भेटीसाठी कार्यकर्त्यांची रीघ लागलेली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाले हे पसंत नाही आणि हे असेच सुरु राहिले तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. म्हणून देश वाचविण्यासाठी लोक शिवसेनेसोबत येत आहेत. दोन तीन दिवसापूर्वी मी एका उत्तर भारतीयांच्या बैठकीत गेलो त्याप्रसंगी देखील सांगितले की, त्यावेळची लढाई होती ती स्वातंत्र्य मिळविण्यासाठीची लढाई होती.आता हि स्वातंत्र्य टिकवायची लढाई आहे. गुलामगिरी ती गुलामगिरीच असते ती परकीयांची असेल किंवा स्वकीयांची असेल. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात आहेत. प्रधानमंत्री उद्घाटने करत आहेत. झेंडे दाखवत आहेत. त्याच वेळेला माझी भारतमाता पुन्हा माझी गुलाम कशी होईल यादिशेने त्यांची पाऊले चालली आहेत. ती पाऊले वेळेत ओळखून आपण एकत्र आले पाहिजे आणि तसा तुम्ही निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मुस्लीम बांधव भगिनी शिवसेनेत आले म्हणून शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका होईल. मात्र टीकाकारांना मी सांगू इच्छितो कि, दिवसापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत हे मशिदीत गेले ते काय शोधून आले? जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला हिंदुत्व शिकवले ते म्हणजे “राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व” आणि देशद्रोही असेल तो कोणीही असेल त्याचा जात,पात,धर्म हा देशद्रोहीच त्याला आमचा विरोध असेल त्या विचाराने आपण एकत्र आलात हि तुमची ताकद खूप मोठे बळ देणारी आहे. हे बळ आणि एकजूट देशाला दिशा दाखवणारी असेल असे त्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स