ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तब्बल पावणे दोन करोड़ची दारु जप्त ; एकूण मुद्देमाल २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा.

तब्बल पावणे दोन करोड़ची दारु जप्त ; एकूण मुद्देमाल २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा.

प्रकाशन: 11 Feb 2023 11:32 AM
वाचन संख्या 178

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने इन्सुली तपासणी नाक्यावर केली कारवाई.

बांदा | राकेश परब : गोवा बनावटीच्या दारुची गोवा ते मुंबई दरम्यान बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई केली. यात तब्बल गोवा बनावटीच्या दारुच्या १ लाख ४४ हजार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या जप्त करण्यात आलेल्या १ कोटी ८७ लाख २० हजार रुपयांची दारू तर २५ लाखांचा कंटेनर व इतर मुद्देमाल १२ हजार असा एकुण २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची खात्री लायक माहिती कुडाळ पथकाला होती. त्यानुसार गेले काही दिवस त्या वाहनावर करडी नजर ठेवून होते. मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवारी सायंकाळी इन्सुली तपासणी नाका येथे वाहन आले असता तपासणी साठी थांबविले. एमएच १२ एलटी ७६१७ गाडीची तपासणी केले असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याचे उघड झाले.

या कारवाईमध्ये संशयित राजशेखर सोमशेखर परगी ( ४१, रा. हुबळी जि.धारवाड), रहमतुल्लाह कासीम खान (४१, रा. कारवार) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांनी केली. या कारवाईमध्ये निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक राहूल मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान वाहनचालक एच. आर. वस्त, जवान शरद साळुंखे, वाहनचालक संदीप कदम यांनी केली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 13
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स