बांदिवडे-मसुरे पुलाचे रुप खुलले ; आंगणेवाडी यात्रा २०२३ चे औचित्य.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडीतील श्री देवी भराडी यात्रा २०२३ चे औचित्य साधून बांदिवडे-मसुरे पुलाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. बांदिवडे सरपंच,उपसरपंच आणि इतर सर्व सदस्यांच्या पाठपुराव्याने हे काम पूर्ण झाले.
यावेळी कामाच्या देखरेखीसाठी बांदिवडे सरपंच आशू मयेकर, सदस्य नारायण परब ,स्वप्नील मुणगेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.रंगरंगोटीमुळे पुलाच्या खुललेल्या रुपामुळे यात्रेकरू तसेच इतर पर्यटकांमध्येही आता नेत्रसुखद भावना येईल असे समाधान उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)