आंध्रप्रदेशच्या नवीन राजधानीची घोषणा..!
ब्युरो न्यूज | हैदराबाद : आगामी काळात आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी विशाखापट्टणम असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली. मार्चमध्ये विशाखापट्टणम येथे होणार्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिट तयारीच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. मार्चमध्ये विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’च्या तयारीच्या बैठकीला संबोधित करताना रेड्डी म्हणाले की, ते येत्या काही महिन्यांत आंध्रप्रदेशचे कार्यालय विशाखापट्टणम या बंदर शहरात हलवले जाणार आहे. आणि या इथून पुढे आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम हेच शहर असणार असल्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या बैठकी दरम्यान स्पष्ट केले.
यापूर्वी २३ एप्रिल २०१५ ला चंद्राबाबू नायडू यांच्या तत्कालीन टीडीपी सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले. या २०२० मध्ये जगन सरकारनेच आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलची नावे समोर आली. मात्र, वायएसआर काँग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी बनवण्याची चर्चा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)