पळसंबच्या श्री.जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी सदस्यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर ट्रस्टच्या पदाधिकार्यांची घेतली भेट.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील श्री.जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी श्री. क्षेत्र कुणकेश्वर ट्रस्टच्या पदाधिकार्यांची काल ३० जानेवारीला भेट घेतली. श्री.क्षेत्र कुणकेश्वर तीर्थयात्रेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत अनुशासित नियोजनासाठी महत्वाची मानली जात आहे.
श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंबने श्री. क्षेत्र कुणकेश्वर ट्रस्टच्या पदाधिकारी यांची भेट घेत पळसंब देवस्थान कुणकेश्वर देव भेट तीर्थयात्रा भेटीला येत असल्यानिमित्त पूर्व कल्पना देत नियोजना विषयी चर्चा केली. या भेटीला देवस्थान मानकरी श्री . श्री प्रकाश कापडी, ट्रस्टचे अध्यक्ष)श्री रमेश परब , खजिनदार श्री चंद्रकांत गोलतकर, सहसचिव श्री अमित पुजारे तसेच कुणकेश्वर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
पूर्वनियोजित कल्पना दिल्यामुळे यजमान देवस्थान ट्रस्टला तीर्थयात्रा नियोजन करणे सोयीचे होते त्यामुळे ही भेट घेण्यात आल्याचे श्री. जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट पळसंबचे खजिनदार श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी ट्रस्टच्या वतीने स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)