मानसी पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम.
मसुरे | प्रतिनिधी : पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यालय एप परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (इयत्ता चौथी) यांनी मालवण तालुक्या मध्ये संयुक्तपणे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५ नोव्हेंबर २०२० रोजी सदर स्पर्धा मालवण येथे संपन्न झाली होती. मानसी आणि यशश्री हिला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र यावेळी देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी मानसी आणि यशश्री हिने विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
मानसी पेडणेकर हिचे मालवण पंचायत समितीचे सभापती श्री अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश परूळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय माने, मसुरे केंद्र शाळा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, मसुरे केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शाळा समिती अध्यक्ष बापू मसुरेकर, यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)