खारच्या 'जवाहर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' एकताड तर्फे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.
पळसंबच्या जयंती देवी प्रासादीक मंडळाची वारकरी दिंडी आहे प्रमुख आकर्षण.
मालवण | सुयोग पंडित : मुंबईतील जवाहर नगर, खार (पूर्व)मधील ‘जवाहर नगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ,एकताड यांच्यातर्फे २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव संपन्न होणार आहे.
या उत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या जयंती देवी प्रासादिक भजन मंडळाची वारकरी दिंडी हे एक प्रमुख आकर्षण असेल. २५ जानेवारीला रात्री ८:३० वाजता ही वारकरी दिंडी संपन्न होणार आहे.
या संपूर्ण सोहळ्याला जास्तीतजास्त गणेश भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन व निमंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्रनाथ (बाळा) के. परब , श्री. चंद्रकांत (जितू) गो. पेडणेकर(सचिव),कार्यकारी मंडळ अध्यक्ष श्री. सुशांत नं. राघव आणि सचिव कु. यश सा. सुर्वे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)