ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल गुरव संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी अंकुश बाबाजी गुरव यांची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अखिल गुरव संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी अंकुश बाबाजी गुरव यांची निवड.

प्रकाशन: 17 Jan 2023 05:14 PM
वाचन संख्या 150

मसुरे | प्रतिनिधी : अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी घोडगे सोनवडे गावच्या अंकुश बाबाजी गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सायली संतोष गुरव यांच्या शिफाफशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.अंकुश गुरव हे मूळचे सोनवडे ( घोटगे ) गावचे रहिवासी असून अभ्युदयनगर काळाचौकी येथे स्थित आहेत. सोनवडे ग्रामविकास मंडळाचे मागील ७ वर्षे ते अध्यक्ष असून या मंडळामार्फत मागील ३५ वर्षे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम मुंबई सह गावीसुद्धा राबवले जातात.मुंबईत खाजगी शिपिंग कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेले अंकुश गुरव हे नेहमीच ज्ञातीबांधवांसाठी सहकार्याला पुढे असतात. अभ्युदयनगर काळाचौकी शिवसेना शाखा क्र.205 चे उपशाखाप्रमुख असलेल्या अंकुश गुरव यांचा मुंबईसह मूळ गाव सोनवडे घोटगे सह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. गोर गरीब जनतेचे ते आधारवड आहेत. गुरव समाजाच्या उन्नती साठी ते नेहमी पुढे असतात. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांचे मुंबई येथे मोठे कार्य असून राजकीय धार्मिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. हा निवडीनंतर बोलताना अंकुश बाबाजी गुरव म्हणाले माझ्या समाजासाठी, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांच्या सहकार्याने मिळालेल्या पदाचा उपयोग करून माझा समाज पुढे नेण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या समाज बांधवांसाठी मी २४ तास उपलब्ध असून त्यांचे सर्वांगीण हित जोपासण्याचा माझा प्रयत्न राहील.
त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय सामाजिक, घोडगे सोनवडे ग्रामस्थ तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे…

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स