मालवणात पंचायत समिती मार्गावर मनसे तर्फे सोलर लाईटचे लोकार्पण.
मनसे कामगार सेना कार्याध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या माध्यमातून सोलर लाईटची सोय.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या पंचायत समिती मार्गावर मनसेचे कामगार सेना कार्यध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या माध्यमातून सोय झालेल्या सोलर लाईटचे आज लोकार्पण करण्यात आले.
मनसे महिला माजी शहर अध्यक्ष भारती वाघ व भाई मालंडकर यांच्या विशेष उपस्थितीत हे लोकार्पण झाले.
यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड , शाखा अध्यक्ष तुषार जुवेकर, माजी तालुका अध्यक्ष रामनाथ पराडकर आणि माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)