ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जनसेवा निधी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथे संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जनसेवा निधी संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथे संपन्न.

प्रकाशन: 03 Jan 2023 07:13 PM
वाचन संख्या 25

बांदा | राकेश परब : समाजात वावरत असताना आपली कर्तव्ये प्रामाणिक पार पाडणे यालाच समाजसेवा म्हणतात. वास्तविक पाहता युवक युवती मध्ये सेवाभाव निर्माण झाला पाहिजे.डॉ द. भि. खानोलकर म्हणजे सेवाभाव त्यांच्या या जनसेवा निधी मधून उत्तम कार्य केले जाते. आज जे पुरस्कार देण्यात आले त्यांची निवड खरोखरच उल्लेखनीय आहे. दहावी बारावी मध्ये कोकण राज्यात प्रथम असत मात्र ही एवढी हुशार मुले त्यानंतर मात्र मोठया प्रमाणात युपीएससी वा इतर क्षेत्रात दिसत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.समाजाला विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचे काम जनसेवा निधी मार्फत केले जाते.असे प्रतिपादन पत्रकार शेखर सामंत यांनी केले.


यावेळी सामंत डाँ.द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी ,बांदा या संस्थेमार्फ़त दिल्या जाणाऱ्या २०२२-२३ यावर्षीच्या पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी जि.प.केंद्रशाळा बांदा नं.१ येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ मिलिंद खानोलकर, पुरस्कारप्राप्त तेजस बांदिवडेकर, दीप्ती प्रभू,सुषमा केणी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. द .भि. खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर दीपप्रज्वलनाने अध्यक्ष शेखर सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जनसेवा निधीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण आदर्श प्राथमिक शिक्षिक पुरस्कार पुर्ण प्राथमिक शाळा वजराट नं.१(वेगुर्ला) प्रशाळेचे शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर, माध्यमिक आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कूल,वेतोरे च्या शिक्षिका दिप्ती मोतीराम प्रभू यांना, तर एक क्रियाशील आदर्श समाजसेवक पुरस्कार कणकवली येथिल सुषमा दयानंद केणी,सुरेश गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामंत पुढे म्हणाले, मला डॉ द भि खानोलकर यांचा सेवाभाव ऐकून होता. मात्र त्यांच्या या जनसेवा निधी मधून सुद्धा त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम आपण सर्वजण करत आहात.हे कौतुकास्पद आहे विशेष म्हणजे ज्यांचे समाजासाठी उत्तम काम सुरू आहे त्यांची पुरस्कारासाठी योग्य निवड करण्यात आली. या कार्यक्रमात असलेली शिस्तसुद्धा वाखाण्याजोगी आहे .
तर आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक (माध्यमिक विभाग) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कुल व ज्युनिअर काँलेज,आंबोलीचे प्राचार्य सुरेश तुकाराम गावडे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण भारतचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी पुरस्कारप्राप्त बांदिवडेकर, प्रभू, केणी व गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.तर जनसेवा निधी मार्फत पुरस्कारासाठी निवड केल्याने आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे, सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी तर आभारप्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ अरविंद खानोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, दिलीप फडके, हेमंत खानोलकर, सुधीर शिरसाट, सुनील नाटेकर, बंड्या नार्वेकर, मंगेश कामत, गणेश गर्दे, प्रेमानंद नाडकर्णी, राजू तावडे, तुळशीदास धामापूरकर, श्री वावळीये, अच्युत पिळणकर, जे डी पाटील, सतीश येडवे, डॉ संजय सावळ, डॉ भालचंद्र कोकाटे, नार्वेकर आदीसह बांदा सह इतर भागातून ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स