बांदिवडे येथील संगीता बाबाजी मयेकर कालवश.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे मळावाडी येथील रहिवासी श्रीमती संगीता बाबाजी मयेकर ८० वर्षे यांचे नुकतेच मुंबई डोंबिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, दिर, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मयेकर, संतोष मयेकर व मुंबई येथील युवा कार्यकर्ते संदीप मयेकर, सुनील मयेकर यांच्या त्या मातोश्री आणि बांदिवडे सरपंच आशु मयेकर यांच्या त्या आजी होत.
संगीता मयेकर यांच्या निधनाने मसुरे व परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)