ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आशिष तानाजी बागवे यांची त्रिंबक ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड....!

आशिष तानाजी बागवे यांची त्रिंबक ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड....!

प्रकाशन: 30 Dec 2022 10:02 PM
वाचन संख्या 40

🟡 सरपंच किशोर त्रिंबककर व उपसरपंच आशिष बागवे यांनी स्वीकारला पदभार.

विवेक परब- ब्यूरो चिफ: मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशिष तानाजी बागवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नूतन सरपंच किशोर त्रिंबककर व उपसरपंच आशिष बागवे यांनी आज पदभार स्वीकारला. त्रिंबक ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने वर्चस्व प्राप्त केले होते. गुरुवारी उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी आशिष तानाजी बागवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली आहे.

यावेळी नूतन पदाधिका-यांचे भाजप विभागिय अध्यक्ष संतोष कोदे, जेराँन फर्नांडीस, खरेदी विक्री संघ मालवण अध्यक्ष राजन गांवकर यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, सुचिता घाडीगांवकर, संतोषी सावंत, ग्रामसेवक सुर्यवंशी मँडम, राजू त्रिंबककर, शेखर त्रिंबककर, संजय वेंगुर्लेकर, एकनाथ घाडीगांवकर, अशोक बागवे, प्रमोद बागवे, अनिल लब्दे, ज्ञानू साटम, मुकुंद दामले, नागेश साटम, संजय पवार, विजय सावंत, एकनाथ शेडगे, विवेक जाधव आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स