'शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' पुरस्कृत कोळंब गांव विकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा श्री गणेशा.
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गावविकास आघाडी पॅनेल निवडणुकीसाठी सज्ज.
मालवणचे माजी नगरसेवक , माजी बांधकाम सभापती व प्रचार प्रमुख यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली कांदळगांवच्या श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करुन झाली प्रचाराची सुरवात.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुक प्रचार सुरु झाला आहे.
कोळंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत ‘कोळंब गावविकास आघाडी’ पॅनेलच्या उमेदवारांनी आपला प्रचाराचा श्री गणेशा केला.
कांदळगांवच्या श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करुन ,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रचारप्रमुख आणि मालवणचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची सुरवात करण्यात आली.
यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार सिया धुरी, संपदा प्रभू ,संजना शेलटकर, विजय नेमळेकर, निकिता बागवे ,नंदा बावकर, संदीप आचरेकर, रोशन आचरेकर ,मेघना चव्हाण, स्वप्निल परब यांच्यासह निखिल नेमळेकर, बापू बावकर , राजू साळकर , समीर प्रभू , अक्षता साळकर, दिलीप नेमळेकर, अनिकेत परब ,सदा कांबळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव यांचे मार्गदर्शन आणि कोळंब गावातील जनतेची साथ आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत असल्यामुळे ,’शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत कोळंब गांव विकास आघाडी पॅनेलचा’ विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रचार प्रमुख यतीन खोत यांनी व्यक्त केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)