इन्सुलीची ग्रामदेवता श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १० डिसेंबरला.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुलीचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी १० डिसेंबरला संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मानाप्रमाणे ओट्या भरणे व त्या नंतर नवस बोलणे, नवस फेडणे , भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री १२ वाजता पालखी सोहळा झाल्यानंतर सुधीर कलिंगण दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इन्सुली ग्रामस्थ, श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवस्थानच्या मानकरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)