ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे दोन संघ अजिंक्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे दोन संघ अजिंक्य.

प्रकाशन: 05 Dec 2022 03:14 PM
वाचन संख्या 53

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : न्यु. इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथील पार पडलेल्या शालेय कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या आणि 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले असून त्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेता पदापर्यंत धडक मारून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यशस्वी खेळाडूंना सौ.पुजा पाताडे,यशवंत परब,अनिल जमदाडे यांच्यासह क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,सौ.रजनी कासार्डेकर,ऋषीकेश खटावकर, नवनाथ कानकेकर ,सौ.वैष्णवी डंबे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
१४वर्षा खालील मुलांच्या संघात अभिषेक आडे (कप्तान ),सुमित राठोड,चेतन पवार,परशुराम राठोड, मनोज जाधव,प्रणय पवार,गौरेश शिंदे,सुमित राठोड,भूपेश सुतार,अर्शद हुलिकेरी,प्रथमेश पवार,
तेजस आईर आदी खेळाडूंचा समावेश आहे.

तर १४ वर्षांखालील मुलींच्या संघात नेहा पन्हाळकर (कर्णधार), नंदिनी चव्हाण , लक्ष्मी पवार,आश्विनी चव्हाण,दिक्षा पाताडे,भार्गवी खानविलकर, ऋती मिसळ, जान्हवी रणम,काजल चव्हाण,प्रगती निकम,मयुरी दळवी अशा यशस्वी खेळाडूंचा समावेश आहे.
तर या स्पर्धेत कासार्डे ज्युनियर कॉलेज मधील १९ वर्षांखालील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक यशवंत परब,सौ.पुजा पाताडे व अनिल जमदाडे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,सौ.रजनी कासार्डेकर, नवनाथ कानकेकर, सौ.वैष्णवी डंबे व ऋषिकेश खटावकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स