शिवसेनेचे साळेल ग्रामपंचायत सरपंच म्हणून रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध निवड.
श्री. रविंद्र सहदेव साळकर यांचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या बाजूने गावागावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकामध्ये शिवसेनेचे उमेदवार लढत देत आहेत. यावेळी साळेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावचे सरपंच म्हणून श्री. रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
यावेळी श्री. रविंद्र सहदेव साळकर यांचे शिवसेनेच्या वतीने शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, संग्राम प्रभुगांवकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, जान्हवी सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)