ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे देऊळवाडा येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.

मसुरे देऊळवाडा येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 04 Dec 2022 11:58 AM
वाचन संख्या 57

५ डिसेंबरला ‘नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा…!’

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान दत्तवाडी ,दत्तमंदिर येथे दत्तजयंती उत्सवा निमित्त ५ ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ५ रोजी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. मंगळवार ६ रोजी रात्रौ ९ वा. २०/२० भजन डबलबारी सामना बुवा – श्री संदीप पुजारे( ता. देवगड) विरुद्ध बुवा श्री संदीप लोके (ता. देवगड). बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वा. पर्यंत विधीवत दत्तमुर्ती व पादुका पुजन, अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, सायं. ६ ते ९ वा. पोथी वाचन व स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९ ते ११ वा. दिंडी नृत्य, रात्रौ ११ वा.दीपोत्सव, रात्रौ १२ वाजता दत्तजन्म सोहळा व पालखी मिरवणूक. गुरुवार ८ रोजी दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसाद. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स