ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेत दिले निवेदन.

मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेत दिले निवेदन.

प्रकाशन: 30 Nov 2022 05:45 PM
वाचन संख्या 267

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मूळ पळसंब येथील मुंबईस्थित ग्रामस्थांनी काल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी पळसंब गावाच्या वतीने पळसंब गावात आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र व्हावे असे लेखी निवेदन आरोग्य मंत्र्यांना दिले.
पळसंब ग्रामस्थांच्या वतीने प्रदीप परब, पदमाकर परब व हरीश सावंत इत्यादी मुंबईकर मंडळींनी हे निवेदन सादर केले.
गत वर्षीही तत्कालीन आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना याच मुद्द्यावरील निवेदन दिले गेले होते . पळसंब आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्राची मागणी आता आणखीन जोर धरु लागली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स