ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
ओबीसी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थी करीता एक रकमी परतफेड योजना सुरू.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओबीसी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थी करीता एक रकमी परतफेड योजना सुरू.

प्रकाशन: 30 Nov 2022 08:52 PM
वाचन संख्या 43

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर  मागास महामंडळ ,जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे कडून विविध योजनांमधून लाभार्थीनी कर्ज घेतलेले असून  थकीत कर्जाची अद्याप परतफेड केलेली नाही अशा कर्जदारासाठी शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजात ५०% सवलत देऊन  कर्ज खाते बंद करता येणार आहे. ही योजना काही कालावधी करीता असून ज्या लाभार्थी चे कर्ज शिल्लक आहे अशा थकीत कर्जदारांनी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्षे आहे व वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाख पेक्षा कमी आहे अशा लाभार्थींना महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये १० लाख  पर्यंत योजनेचा लाभ घेता येईल . असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती प्रीती पटेल यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय संपर्क ०२३६२ २२८११९ / ८६६८८९८९५०या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी,तालुका कुडाळ येथे  भेट द्यावी अशी माहिती देण्यात आली आहे .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स