ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना व सत्संग करायचे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे आवाहन.

अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना व सत्संग करायचे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे आवाहन.

प्रकाशन: 26 Nov 2022 08:19 PM
वाचन संख्या 136

शांकर एकात्मता पदयात्रेचे बांद्यात भव्य  स्वागत…

बांदा | राकेश परब : घरोघरी सायंकाळी दररोज सद्ग्रंथ वाचन, उपासना ,भजन  झाले पाहिजे. गावागावात उपासना वर्ग सुरु झाले पाहिजेत. समाजात एकी वाढली पाहिजे.समाज प्रगतीची गती साठलेल्या डबक्यासारखी नको तर वाहत्या पाण्यासारखी प्रवाही असली पाहीजे.मोक्षप्राप्ती हेच मानवी जिवनाचे अंतिम ध्येय्य आहे.त्याकरीता अध्यात्मिक उन्नतीसाठी साधना व सत्संग केला पाहिजे ,असे प्रतिपादन हळदीपूर वैश्यगुरु मठाधीश श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी बांदा येथे केले. केरळहून गोवामार्गे महाराष्ट्रात आगमन झालेल्या
वैश्य कुलगुरू श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या शांकर एकात्मता पदयात्रेचे बांदा वैश्यवाणी बांधवांच्या वतीने शुक्रवारी बांदा शहरात भव्य स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात आशिर्वचन देताना ते बोलत होते.
शुक्रवारी सायंकाळी उशीरा गोव्यातून पदयात्रेचे बांद्यात  आगमन झाले. बांदा दत्त मंदिर लकरकोट, पत्रादेवी येथुन महास्वामीजीच्या पदयात्रे बांद्यातील शेकडो अनुयायी सहभागी झाले.


गुरुमहाराज गुरुमहाराज जय जय गुरुमहाराज या जयघोषात ही पदयात्रा बांदा शहरात बांदेश्वर मंदिर नाका, गांधीचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉस्पिटल कट्टा, हायवे सर्कल, गवळीटेम्ब येथून पदयात्रा मार्गक्रमण करत भास्कर शांताराम पावसकर यांच्या निवासस्थानी आली. या ठिकाणी उभारलेल्या मंडपातील पीठासनावर श्री श्री वामनाश्रम स्वामी विराजमान झाले.

त्यानंतर स्तोत्र पठण आदी होऊन महास्वामींचे भक्तांना आशिर्वाचन प्रारंभ झाले. त्यानंतर सर्वांनी महास्वामींचे दर्शऩ घेतले व त्याच्याकडून आशिर्वादाच्या फलमंत्राक्षता प्राप्त केल्या. यावेळी स्थानिक भजनकर्मींनी श्री गुरुचरणी आपली भजनसेवा सादर केली. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. शुक्रवारी रात्री पदयात्रेचा मुक्काम बांदा येथे पावसकर यांच्या निवासस्थानी झाला. शनिवारी श्री चंद्र मौळीश्वर देवतांची स्वामीजीच्या हस्ते पूजा झाली. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर बांदा येथून पदयात्रेचे सावंतवाडीकडे प्रयाण झाले.  ही पदयात्रा कातडी (केरळ) ते कशी अशी होत आहे. बांदा नगर वैश्य वाणी समाजाच्या वतीने बांदा येथील सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स