नारळ काढण्यासाठी माडावर चढलेल्या दहीबाव - तांबळवाडी येथील इसमाचा तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू.
शिरगांव | संतोष साळसकर :
नारळ काढण्यासाठी चढलेल्या देवगड तालुक्यातील दहिबांव तांबळवाडी येथील दिलीप शंकर घाडी ( वय ५०) यांचा माडावरून तोल जावून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दिनांक ६ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दहिबांव तांबळवाडी येथील दिलीप शंकर घाडी हे रविवारी सकाळी स्वत:चा माडावर नारळ काढण्यासाठी चढले होते. त्यांनी काही नारळ खाली पाडले. यावेळी त्यांची पत्नी नारळ जमा करीत होती. दरम्यान नारळ काढत असताना त्यांचा अचानक तोल जावून ते जमीनीवर पडले. यावेळी नारळ गोळा करीत असलेल्या त्यांचा पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर चुलत दीर व ग्रामस्थ यांनी धावाधाव केली व जखमी असलेल्या दिलीप घाडी यांनी देवगड येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगीतले.
दिलीप घाडी हे माडावरून खाली पडल्याने त्यांचा छातील गंभीर दुखापत झाली व त्यांची फुफ्फुसे निकामी होवून त्यांचा मृत्यु झाला. देवगड पोलिस स्थानकात याबाबत सचिन चंद्रकांत घाडी यांनी खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास पीएसआय दशरथ चव्हाण करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)