सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षयांनी घेतली पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस चे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांची घेतली भेट
राकेश परब / बांदा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.
सावंतवाडी तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाची कठीण परिस्थिती असताना अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारुन अवघ्या एका वर्षात सावंतवाडी तालुक्यात पक्ष जोमाने वाढविल्याने परब यांनी पुंडलिक दळवींचे कौतुक केले.
यापुढे रमेश परब यांनी पक्ष वाढीसाठी लागणारी मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष सौ.दर्शना बाबर देसाई,सोशल मीडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप, सामाजिक कार्यकर्ते अन्वर खान उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)