ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ऐश्वर्य मांजरेकर यांची दिल्ली फोरमच्या युथ फॉर कोस्ट प्रशिक्षणासाठी निवड.

ऐश्वर्य मांजरेकर यांची दिल्ली फोरमच्या युथ फॉर कोस्ट प्रशिक्षणासाठी निवड.

प्रकाशन: 27 Oct 2022 01:41 PM
वाचन संख्या 86

मालवण | प्रतिनिधी : भारतात गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय धोरणात कमालीचा बदल झाला आहे. ह्याचे प्रतिबिंब महासागर तसेच सागरी किनाऱ्या संदर्भातील नजीकच्या वर्षांत घेण्यात आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरणात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळते. म्हणून मच्छीमार तसेच मच्छीमारी संदर्भात काम करणाऱ्या समुदायांना या धोरणांची माहिती देणे तसेच त्यातून येऊ घातलेले बदल त्याचे विविध पातळीवर तसेच निसर्गावर होणारे परिणाम या संदर्भात जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. तसेच या विषयावर काम करण्यासाठी सामूहिक बांधणी करणे गरजेचे आहे, जे समूह मच्छीमार समुदायाला सर्व स्तरावर माहिती पुरवणे आणि समर्थनाचे काम करतील ज्यामुळे हे समुदाय निसर्ग, किनारे, उपजिविका यावर होणाऱ्या परिणामांच्या आकलनातून निर्णय घेण्यास सक्षम बनतील. युथ फॉर कोस्ट मधील सहभागी व्यक्तींना जटिल सामाजिक-परिस्थितीकीय पाणी आणि जमीन माहिती आणि संसाधने याने सुसज्ज केले जाते. ही सत्रे अशा प्रकारे आखली जातात की त्यातून सह-अध्ययन, फिल्ड भेटीतील सहभाग, स्थानिक समुदायाच्या नेत्यांशी संवाद, समुद्र किनाऱ्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या अभ्यासक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा याचा यात समावेश होतो. सहभागी व्यक्तींना राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर समुद्र किनाऱ्याशी संलग्न विषयावर काम करणाऱ्या चळवळी/संस्था, द्रुष्टीकोन आणि धोरणे यांची ओळख करून दिली जाते, ज्यामुळे धोरणात्मक बदलांचा त्यांच्या स्थानिक मच्छीमार समुदायावर होणारा परिणाम समजण्यास शक्य होऊन ते स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य त्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. या प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने ९ (नऊ) सागरी किनाऱ्यावरील राज्यातील रहिवासी, महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्यांना महाराष्ट्राशी संलग्न विषयावर काम करायचे आहे. अशा २२ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींनी अर्ज केले होते. ज्या मधून २० जणांची निवड करण्यात आली. या मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान गोरेगाव मुंबई येथे पार पडणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांकडून ऐश्वर्य मांजरेकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स