ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा वरचीवाडी येथील श्रीम. मनोरमा बबन चव्हाण यांचे निधन…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा वरचीवाडी येथील श्रीम. मनोरमा बबन चव्हाण यांचे निधन…!

प्रकाशन: 21 Oct 2022 08:36 PM
वाचन संख्या 51

श्रावण | गणेश चव्हाण :
आचरा वरचीवाडी येथील श्रीम. मनोरमा ऊर्फ निराबाई बबन चव्हाण वय वर्ष८५ यांचे २१ ऑक्टोबरला कणकवली येथील खासगी रुग्णालयात ह्रदयविकाराने निधन झाले.
एका शिक्षकाच्या सुशिक्षित पत्नी असल्याने, आचरा परीसरात त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गोरगरीबांना करुन दिला. सतत दुसर्‍यांना कोणत्याही विषयी मार्गदर्शन करणार्‍या कै. मनोरमा बबन चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, चार मुली, जावई, नातवंडे, पुतणे, वहिणी व भाचे असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आचरा अंगणवाडी सेवीका सौ. उषा चव्हाण यांची आई, सिंधुदुर्ग नाभिक संघटणेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या काकी तर मालवण नाभिक अध्यक्ष आनंद ग. आचरेकर यांच्या आत्त्या होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स