मसुरे तांत्रिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल !
मसुरे | प्रतिनिधी: मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम.जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे या प्रशालेतून १८ नियमित व ३ पुनर्परीक्षार्थी प्रविष्ठ होऊन सर्व विद्यार्थि उत्तीर्ण झाले. निकाल १००%. लागला आहे. प्रथम क्रमांक- कौण्डिन्य मिलिंद पवार (७५.००%), द्वितीय क्रमांक-प्रणय प्रकाश चिरमुले, (७२.१७%), तृतीय क्रमांक-प्रथमेश भगवान सावंत (७१.६७%) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुंबई कमिटी अध्यक्ष डॉ. दीपक परब, सेक्रेटरी जे. डी. बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुख्याध्यापक आर डी कीलेदार, शाळा समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, विठ्ठल लाकम, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)