ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बिळवस येथे काथ्या प्रशिक्षण शिबीर संपन्न…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बिळवस येथे काथ्या प्रशिक्षण शिबीर संपन्न…!

प्रकाशन: 09 Oct 2022 05:48 PM
वाचन संख्या 415

दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाची सांगता.

महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे : माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस येथे केंद्रिय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग म॑त्रालय भारत सरकार यांच्या तर्फे काॅयर बोर्ड -कोचिन आणि नागरीक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान -सि॑धुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नारळाच्या काथ्यावर आधारित उद्योगाचे कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले.
हे शिबीर बिळवसचे माजी मुख्याध्यापक श्री सूर्यकांत ज. पालव यांच्या घरी आयोजित करण्यात आले.

हे प्रशिक्षण दोन महिन्यांच्या कालावधीचे होते . या प्रशिक्षण काळात महिलांना काथ्या पासून सु॑भ, दोरी, पायपुसणी, प्लावर पाॅट इत्यादी वस्तू शिकविण्यात आल्या. तसेच साबण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा उपयोग करून प्रत्येक महिलेने स्वतःचा रोजगार निर्माण करून आत्मनिर्भर, आर्थिक स्वावलंबी व्हावे अशी अपेक्षा यावेळी श्री पालव सर यांनी व्यक्त केली.
सरपंच सौ मानसी पालव यांनी ग्रामपंचायत कडुन आवश्यक मदत देण्यात येईल. या करीता महिलांनी स्वतः होऊन पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. सौ अनुपमा पालव यांनी प्रशिक्षण काळात मोलाचे सहकार्य केले. यावेळी रेश्मा फणसे, सिद्धी पालव, रिया पालव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाला सेवा प्रतिष्ठान -सि॑धुदुर्ग अध्यक्ष
श्री अनिल गावडे व प्रशिक्षक सौ अनिता परब यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. सौ अमृता पालव यांनी आभार मानले. या वेळी आदर्श महिला ग्रामस॑घ बिळवस अध्यक्ष सौ रिया पालव तसेच प्रशिक्षणार्थी वीस महिला उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स