नगराध्यक्षांचे विकास कामे दिसत नसतील तर चष्म्याचा नंबर तपासून घ्यावा…..
नगरसेविका आकांशा शिरपुटे यांचा गणेश कुशेंना टोला.
वैभव माणगांवकर / मालवण : गणेश कुशे सारख्या नगरसेवकाने कार्यतत्पर नगराध्यक्षांवर टीका कारणे हास्यास्पद. गेली साडेचार वर्ष मालवणचे नगराध्यक्ष हे मालवण शहर सुधारणीसाठी झटत आहेत, या कालावधीत नगराध्यक्षांनी मालवण शहरात बरीच विकास कामे केली आहेत नगरपालिका ईमारत सुशोभीकरण, अग्निशामक बिल्डिंग, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, कर्मचारी वसाहत तसेच पर्यटनाचे आकर्षण ठरलेले म्युसिकल फाऊंटणं असे अनेक प्रकल्प आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत साहेब तसेच पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षयांनी मालवण शहरासाठी आणले आहेत.एवढ्या कोट्यावधि रुपयांचे प्रोजेक्ट नगरसेवक गणेश कुशे यांना दिसत नसतील तर त्यांनी आपल्या चष्म्याचा नंबर तपासून पहावा. असा टोला नगरसेविका आकांशा शिरपूटे यांनी लगावला आहे.
त्याशिवाय वादळानंतरची मालवण शहरातील हानी, रस्त्यावर पडलेली झाडे झुडपे असो व मोडून पडलेले लाईटीचे पोल . हे सर्व काही सुरळीत सुरु व्हावे यासाठी नगराध्यक्षकानी वेळो वेळी संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व काही व्यवस्थित सुरु केले आहे. त्याच प्रमाणे मालवण शहरात बहुतांशी ठिकाणी रस्त्याची कामे पूर्ण झाली गटारांचे कामे पूर्ण झाली आहेत.याची माहिती जर नगरसेवक गणेश कुशेंना नसेल तर त्यांनी शासन दरबारी घ्यावी व आपण कुठे अपयशी पडतोय त्याचे आत्मपरिक्षन करावे. जे वेळ गणेश कुशे यांनी दुसऱ्यांवर टीका करण्यात वाया घालवला आहे ते वेळ जर शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी दिला असता तर जनतेचा फायदा झाला असता.
नगरसेवक यतीन खोत हे सुरवातीपासून सेवाभावी वृतीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक सर्वत्र होतच आहे व ते आमच्या पक्ष्याचे नगरसेवक आहेत याच आम्हाला अभिमान आहे. गेल्या काही महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरासरीच्या नोंद विचारात घेता मालवण तालुक्यात सार्वधिक पाऊसाची नोंद आहे व असे असतानाही मालवण शहरात काही अपवाद वगळता शहरातील गटारे सफाईचा काम हे कौतुकास्पद आहे ह्या सगळ्याचे श्रेय माननीय नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व त्यांच्या सहकाऱयांना मिळत. याचा अर्थ असा होतो कि ह्यावर जर गणेश कुशे टीका टिपणी करतायत म्हणजे यावर आपण कुठे तरी अपयशी पडत आहोत. आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांवर टीका शाश्त्र करत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)