फेरीवाल्यांचा महिला सह आयुक्तांवर प्राणघातक हल्ला
डोक्यावर चाकु भिरकावला ; बोटावर निभावले.
ब्युरो न्यूज / ठाणे : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सहआयुक्तांवर एका फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला, असून यामध्ये आयुक्ताची दोन बोटे छाटली गेली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगरक्षकांची बोटेही तुटली आहेत. या प्रकारामुळे ठाण्यासह संपूर्ण मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या फेरीवाल्याला अटक केली आहे.
फेरीवाल्यांनी आयुक्तांच्या डोक्यावर चाकु भिरकावला असता, त्याच वेळेस हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली. ती तुटून खाली पडले तरी या हल्ल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकांचीही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले तर यावेळी येथील स्थानिक नागरिक माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्या या हल्ल्यात फेरीवाल्याने धारदार शस्त्र वापरले त्यामध्ये पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. अमरजीत यादव असे हल्लेखोर फेरीवाल्याच नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी देखील संबंधित घटनेचा मोठा धसका घेतला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)