काळसे गांवच्या गोसावी वाडीतील श्रीमती वासंती वसंत गोसावी कालवश.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी व गणेशमूर्तीकार सतिश गोसावी ऊर्फ बाळू यांच्या त्या मातोश्री होत.
चौके | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या काळसे गोसावीवाडी येथील श्रीमती वासंती वसंत गोसावी (वय ९५) यांचे गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने काळसे येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. विनोद गोसावी तसेच गणेशमूर्तीकार श्री. सतिश गोसावी ऊर्फ बाळू यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना , जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे काळसे परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)