ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खाद्यतेल स्वस्त होणार….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खाद्यतेल स्वस्त होणार….!

प्रकाशन: 14 Sep 2022 10:44 AM
वाचन संख्या 111

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : यंदा दिवाळी सणाच्या पूर्वी देशातील जनतेला एक खाद्य दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देशात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 10 लाख टन तेल आयात होऊ शकते. जुलै महिन्याच्या तुलनेत देशाने ऑगस्ट महिन्यात ८७ टक्के इतके वाढीव खाद्यतेल आयात केले आहे. गेल्या ११ महिन्यातील ही सर्वोच्च आयात ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाच्या किमतीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. याचाच लाभ घेत आता भारताने मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली असल्याचे समजते.

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनवरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात 9,94,997 टन पामतेल आयात करण्यात आलं. त्याच्या तुलनेनं जुलै महिन्यात 5,30,420 टन पामतेल आयात करण्यात आलं होतं. हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढलं. तर सप्टेंबर महिन्यात देशात 10 लाख टन तेल आयात केलं जाऊ शकते.
पामतेल इतर खाद्यतेलांच्या मानाने स्वस्त किंमतीला उपलब्ध असल्याने तेल कंपन्यांनी अधिक पामतेल आयात केले आहे. देशात आता सणांचा मोठा कालावधी सुरु झाला आहे. काही दिवसांवर दिपावलीचा सण आहे. अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात इतर सर्व खाद्यतेलांच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे असा अर्थ व बाजारतज्ञांचा अंदाज आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स