ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
स्वखर्चातून झाडे व ग्रास कटाई

स्वखर्चातून झाडे व ग्रास कटाई

प्रकाशन: 31 Aug 2021 03:48 PM
वाचन संख्या 62

नगरसेवक यतीन खोत यांचा उपक्रम

नागरिकांच्या मागणीनुसार कर्तव्य भावनेतून प्रभागातील रस्त्याच्या दुतर्फा काम सुरू : नगरसेवक यतीन खोत यांची माहिती

वैभव माणगांवकर / मालवण : मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. मात्र स्वच्छता विभागात कोरोना प्रादुर्भावमुळे स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी निर्माण होत आहेत. तरीही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करून प्रत्येक समस्येवर मार्ग काढत नागरिकांना सेवा देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न सुरू आहे.

वादळानंतर बहुतांश सर्व ठिकाणी खंडित झालेली स्ट्रीट लाईट सेवा पूर्ववत केली जात आहे. बहुतांश ठिकाणी नवे लाईट बसवण्यात आले आहे. राहिलेले कामही लवकर पूर्ण केले जाणार आहे.

त्या बरोबर आगामी गणेशोत्सव लक्षात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत तोडण्याची मागणी शहरात सर्वच भागातून होत आहे. काही ठिकाणी कामही सुरू झाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी लक्षात घेता कामाची व्यापकता मोठी आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता पालिका सहकार्य करण्याच्या उद्देशाने माझ्या तीन नंबर प्रभागात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत स्वखर्चाने तोडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज मंगळवार पासून कामही सुरू झाले आहे.

पालिका स्वच्छता विभागाकडून काम होईलच. मात्र लवकर काम पूर्ण व्हावे या उद्देशाने तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रति असलेल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून प्रभागात काम सुरू करण्यात आले आहे. असे नगरसेवक यतीन खोत यांनी माहिती देताना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स