ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्ले शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश..

वेंगुर्ले शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश..

प्रकाशन: 28 Aug 2022 05:00 PM
वाचन संख्या 183

‘शत प्रतिशत भाजपा’ संकल्पनेला मिळतोय उत्तम प्रतिसाद.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष जगंन्नाथ उर्फ नाथा सावंत -मांजरेकर यांचे सुपुत्र व शहरातील भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रीतम उर्फ पींटू सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यांची पहाणी करण्यासाठी आली असता कुडाळ येथील एम.आय. डी.सी. विश्रामगृहामध्ये हा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी नाम. रविंद्र चव्हाण यांनी सर्व युवकांचे भाजपा मध्ये स्वागत केले. तसेच मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे नेते-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेले “शत प्रतीशत भाजपा” ही संकल्पना वेंगुर्ले शहरात सत्यात आणन्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच भाजपा मध्ये आपल्या कार्याचा सन्मान होईल असे अभिवचन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन व स्वागत केले व भविष्यात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले .

यावेळी प्रीतम सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकतृत्वावर प्रभावीत होऊन भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.

प्रीतम सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वानंद पोतनीस, नितीन राणे, बसत्याव आरावुज, सुधीर पालयेकर, योगेश सावळ, प्रणिल सावळ, मनोहर पाटकर, कपिल सावंत, शुभम सावंत,
नवनाथ सावंत, नितीन तेली, आदित्य खानोलकर, राकेश परब, भुषण सावंत, राजाराम सावंत, शानन आरावुज, कैतान आरावुज, अक्षय सावंत, प्रथमेश सावंत, बाळा गावडे, यतीन सावंत, केदार सावंत इत्यादी युवकांनी प्रवेश केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स