ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>बांदा मराठा समाजाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त बांदा शहर मर्यादित गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन..!</em>

<em>बांदा मराठा समाजाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त बांदा शहर मर्यादित गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन..!</em>

प्रकाशन: 24 Aug 2022 08:23 PM
वाचन संख्या 34

बांदा | राकेश परब :
बांदा मराठा समाजाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत बांदा शहर मर्यादित गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी १ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्यात येणार असून तिसऱ्या व चौथ्या दिवशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परीक्षण करण्यात येणार आहे.

स्पर्धेची सविस्तर माहिती मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी दिली. स्पर्धा हि बांदा शहर मर्यादित होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ २ क्रमांकांना प्रत्येकी १ हजार पाचशे रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हि स्पर्धा खुली असून सहभागी सर्व स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी विराज परब (धन्वन्तरी मेडिकल स्टोअर्स, कट्टा कॉर्नर बांदा, मो. ९४०४२१४६६३) किंवा महिला मराठा समाज अध्यक्षा सौ. अवंती पंडित (मो. ९२८४५७७७९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी नंतर बांदा येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स