बांदा शहरात चोरी…!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातल्या गवळीटेम्ब येथील भर वस्तीतील ओंकार अपार्टमेंट मधील २ दुचाक्या चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच बांदा वाफोली सीमेवरील गणपती मंदिरातील फंडपेटी देखील अज्ञात चोरट्याने फोडून आतील रक्कम लांपास केली. बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ओंकार अपार्टमेंट मधील विष्णू शेशांप्पा नरळे यांच्या मालकीची (एमएच ४५ व्ही ८२३५) व त्यांच्या वडिलांच्या मालकीची (एमएच ०७ ए ८१८५) आशा दोन दुचाकी रात्री चोरीला गेल्या. आज सकाळी नारळे यांनी पाहणी केली असता दोन्ही दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची खबर बांदा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. फंडपेटी चोरी प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)