ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वनविभाग रेंजर्स असोसिएशनच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वनविभाग रेंजर्स असोसिएशनच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..!

प्रकाशन: 22 Aug 2022 11:50 AM
वाचन संख्या 57

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक रेंजर्स असोसिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीने वनविभाग सावंतवाडी येथे घेण्यात आली.

वनविभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मोठ्या संख्येने रिक्त असणाऱ्या वनपाल, वनरक्षक, लेखापाल,लिपिक इ. पदे व त्यामुळे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कामकाज करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करणेत आली.

सर्वच पाचही जिल्ह्यातील वनविभागामध्ये क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध समस्यांबाबत सखोल चर्चा करून त्याबाबत योग्य तोडगा काढणेकरिता मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांना अवगत करणेबाबत एकमत झाले.

दरम्यान बुलढाणा येथील आमदार श्री. संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात असंवैधानिक भाषा वापरले नंतर लगेचच वनक्षेत्रात अपप्रवेश करणाऱ्या मेंढपाळांनी तेथील शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या दोन वनमजुरांवर प्राणघातक हल्ला केलेने सदर घटनेचा असोशिएशनच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

तसेच,नूतन मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कोल्हापूर श्री. आर. एम. रामानुजम यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 रोजी वनवृत्तामध्ये वन, वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत उत्कृष्ठ कामकरणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन गौरविल्याबद्दल एकमताने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त विभागीय वनाधिकारी श्री. दीपक शिरोडकर, रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर चे अध्यक्ष श्री नंदकुमार नलावडे,सचिव श्री अरविंद कांबळे तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स