<em>75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन….!</em>
गावात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली मधील वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच वेधले लक्ष…
वैभववाडी | प्रतिनिधी : ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चे व प्राथमिक शाळा सडूरे केंद्र नंबर एक चे ध्वजारोहण गावचे रहिवासी माजी सैनिक श्री सुरेश पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळा सडूरे केंद्र नंबर एकच्या विद्यार्थ्यांचा भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक पवार साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. माजी सैनिक संतोष राणे यांचे कुटुंबप्रमुख पिताश्री सुभाष राणे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून गावातील दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री दशरथ पडवळ यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच गावामध्ये आरोग्य विभागात आरोग्य सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती कर्मचारी श्री विजयसिंह काळे यांचा देखील शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक अनंत उर्फ अण्णा सुतार यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर ग्रामपंचायत ते विकास विद्यालय सडूरे अरुळे (इमारत सडूरे) पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक, अधिकारी कर्मचारी हे एकत्र येऊन हातात भारत मातेचा तिरंगा घेऊन, विविध वेशभूषा करत, देशातील थोर समाजसुधारकांचे फोटो हातामध्ये घेत “भारत माता की जय वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो,” अशा अनेक घोषणा देत अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. वंदे मातरम म्हणत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या हर घर तिरंगा संकल्पनेतून सडूरे तुळशीचे भरड येथील निवासस्थानी उभारण्यात आलेल्या तिरंग्याला सलामी देत. संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थितांना खाऊ वाटप करून उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानत कार्यक्रम संपवला. यावेळी गावचे रहिवासी माजी सैनिक श्री पवार सुरेश, प्रभारी सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्या आकांक्षा जंगम, पुनम रामाने, लक्ष्मीबाई बोडेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, माजी सैनिक संतोष राणे यांचे पिताश्री सुभाष राणे, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विजयसिंह काळे, दशरथ पडवळ, बचत गटाच्या सीआरपी दीक्षा रावराणे, शाळा समितीचे अध्यक्ष प्रभाकर राणे, गाव तलाठी अक्षय लोणकर, आरोग्य सेविका शितल चाफे शाळेचे शिक्षक विनोद करपे सर, कूवर सर, खांबल मॅडम, कांबळे सर, भैराळे सर, व इतर शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)