ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वप्नांचा पाठलाग करताना यशात सातत्य ठेवा- दिलीपकुमार महाजन यांचे प्रतिपादन.

स्वप्नांचा पाठलाग करताना यशात सातत्य ठेवा- दिलीपकुमार महाजन यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 17 Aug 2022 05:06 PM
वाचन संख्या 27

मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मागील सतरा वर्ष श्री भगवती देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम चालू आहे. देवस्थानने शैक्षणिक तसेच आरोग्य साठी निधी उपलब्ध करून ठेवला आहे. आजचे विद्यार्थी भाग्यवान आहेत ज्यांचा सन्मान सर्वांच्या श्रध्दास्थानी असलेल्या आई भगवती देवालयात झाला आहे. भविष्यात यापेक्षाही मोठे सन्मान तुमचे होतील पण आजचा सन्मान तुमच्या आठवणीत राहील. मोठे झाल्यावर गावचे नाव रोशन करा. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा कमीतकमी वापर करावा. स्वप्नांचा पाठलाग करून मिळालेल्या यशात सातत्य ठेवा असे प्रतिपादन देवस्थानचे माजी सचिव दिलीपकुमार महाजन यांनी येथे केले.


देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थानच्या वतीने गावातील पहिली ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव कार्यक्रम श्री भगवती देवालय येथे झाला त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ साक्षी गुरव, देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निशाद परुळेकर, श्री भगवती हायस्कुल मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, माजी सचिव दिलीपकुमार महाजन आदी होते.
सरपंच सौ साक्षी गुरव यांनी देवस्थानच्या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक करत मोठे यश मुलांनी मिळवावे असे सांगितले. माजी विश्वस्थ आबा पुजारे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी आणखी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. यावेळी एम बी कुंज, मंगेश हिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रामतीर्थ कारेकर, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, अनिल धुवाळी, कृष्णा सावंत, प्रमोद सावंत, दिगंबर पेडणेकर, गणपत दळवी, सुरबा सावंत, संतोष पाडावे, राजाराम धुरी, अशोक रूपे, हेमंत धुवाळी, मोहन परब, लक्ष्मण घाडी, रवींद्र आईर, लक्ष्मण मेस्त्री, विश्वास मुणगेकर, रमेश परब, मंगेश हिर्लेकर, आरोग्यसेविका श्रीमती चराटकर, सौ वारंग मॅडम, तसेच शिक्षक, ग्रामस्थ, होते. आभार देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स