<em>स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा मुख्यालय परिसरात स्वच्छता कार्यक्रम..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत स्वराज महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासकीय संकुल परिसरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवडा, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. थोरात यांच्यासह जिल्ह्या मुख्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही आजच्या या स्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील प्लास्टिक, इतर कचरा स्वच्छ केला. तर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्रास कटरच्या सहाय्याने वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)