<em>रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात 'एक राखी निसर्ग बंधनाची' उपक्रम साजरा</em>.
मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात ‘एक राखी निसर्ग बंधनाची’ उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा.हसन खान, प्रा.स्नेहा बर्वे, प्रा. अन्वेशा कदम,प्रा.हर्षदा धामापूरकर प्रा. मिलन सामंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.खान यांनी निसर्ग सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर असतो. त्याच्या रक्षणाची क्षमता मानवात नाही निसर्ग स्वतःच्या रक्षणासाठी सक्षम आहे. मानवाच्या या रक्षकाला आपण मारक होणार नाही यासाठी आपण बांधील राहूया याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात कल्पवृक्षाकडून मानव राखी बांधून घेतो या प्रकारे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विषद करून हर घर तिरंगा आणि ध्वज संहिता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त अकरावी विद्यार्थिनी कु. क्षितिजा खरवते यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास याविषयी माहिती दिली. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.हसन खान तर आभार प्रा. अन्वेशा कदम यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)