ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
इतिहास संशोधक ज्योती बुवा तोरसकर यांचे स.का.पाटील महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न..!

इतिहास संशोधक ज्योती बुवा तोरसकर यांचे स.का.पाटील महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न..!

प्रकाशन: 11 Aug 2022 10:21 AM
वाचन संख्या 125

मालवण | विनीत मंडलिक : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी,इतिहास संशोधक व पुरस्कारप्राप्त शिक्षिका ज्योती बुवा तोरसकर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत हे इतिहास अभ्यासाचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले.

किल्ले सिंधुदुर्गच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती,तत्वं आणि घटकांविषयी ज्योती बुवा तोरसकर यांनी विद्यार्थी वर्गाला बहुमूल्य मार्गदर्शन केले.
‘सिंधुदुर्गच्या इतिहासात महाराणी ताराराणींचे स्थान’ हा व्याख्यानाचा मुख्य विषय होता.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी व प्रमुख व्याख्यात्या ज्योती बुवा तोरसकर यांच्यासह कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्वला सामंत, प्रा.बी.एच.चौगले, प्रा.कैलास राबते, प्रा.स्नेहा बर्वे, नाईक,देवीदास हरगिले हे मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य उज्वला सामंत यांच्या हस्ते व्याख्यात्या ज्योती बुवा तोरसकर यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले गेले.

प्रमोद खरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स