मुणगेत 'वृक्ष संवर्धनाचा' संदेश घेऊन निघाली वृक्षदिंडी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच रक्षाबंधन निमित्त मुणगे तिठा येथील वडाच्या झाडास राखी बांधून वृक्ष संवर्धन संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध घोषणा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती मोनिका कुंज, देवस्थान विश्वस्त दादा सावंत, राजू पुजारे, सुनील पुजारे, शिक्षिका सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, सौ. रश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर, झुंजार पेडणेकर, एन एल बागवे, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, संतोष मुणगेकर, आदी उपस्थित होते. यावेळी शाळेत रक्षा बंधन करण्यात आले. यावेळी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या सणाचे महत्व मान्यवरांनी विध्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचलन सौ गौरी तवटे, आभार सौ रश्मी कुमठेकर यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)