ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने रोणापाल मध्ये विविध कार्यक्रम.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने रोणापाल मध्ये विविध कार्यक्रम.</em>

प्रकाशन: 09 Aug 2022 04:25 PM
वाचन संख्या 49

बांदा | राकेश परब :
आरोग्य,सामाजिक कार्य, सेंद्रिय शेती असे अनेक उपक्रम राबवून देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करूया. दिनांक 13 ते 15 रोजी तीन दिवस प्रत्येकाच्या घरी झेंडा फडकावला पाहिजे असा निर्धार रोणापाल सरपंच सुरेश गावडे व सहकाऱ्यांनी केला.

रोणापाल स्वामी दयासागर छात्रालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामसभा सरपंच सुरेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच पप्या केणी, माजी सरपंच उदय देऊलकर व पदाधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, अंगणवाडी सेविका, बचत गट आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रोणापाल माऊली मंदिर येथे माऊली भजन मंडळ रोणापाल देऊळवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे यशश्री बचत गट, जिल्हा परिषद दवाखाना येथे खेरकटवाडीतील सर्व बचत गट, भरडवाडी अंगणवाडी येथे तेथील पालक व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा येथे पालक व खेरकटवाडी बचत गट, ख्रिश्चनवाडी चर्च येथे तेथील बचत गट यांनी साफ सफाई करण्याची स्वतः म्हणून जबाबदारी स्वीकारली.
तसेच दिनांक 9 ते 17 रोजी पर्यंत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. यात सेंद्रिय शेती बाबतची माहिती देण्यासाठी सावंतवाडी तालुका निवृत्त कृषी अधिकारी काका परब, आरोग्य विषयक माहितीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील तसेच अशा विविध कार्यक्रमांसाठी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिली.

विशेष म्हणजे या महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात 16 तारीखला जिल्हा परिषद दवाखाना रोणापाल येथे ग्रामपंचायत रोणापाल आणि एस.एस.पी.एम.हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्याचे ठरले. आरोग्य शिबिरात हृदय रोग, नेत्र, किडनी, कॅन्सर, जनरल सर्जरी, युरोलोजी, दात आणि अस्थिरोग यासह इतरही तपासणी होऊन उपचारांचे मार्गदर्शनसह व सुविधा उपलब्धतेनुसार काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाईल. शासकीय योजनेत शस्त्रक्रिया करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आणि जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स