प्रा. वैभव खानोलकर यांचा अमरावतीत गौरव
वेंगुर्ला | प्रतिनिधी : दशावतार लोककलेवर डॉक्युमेंटरी व्हिडिओ यूट्यूब वर नुकताच प्रसारित झाला आहे. या डॉक्युमेंटरी ची दखल राज्यस्तरावर मानव सेवा फाउंडेशन घेतली असून ही डॉक्युमेंटरी बनवणारे प्रा. वैभव खानोलकर यांचे अमरावती येथे होणाऱ्या लवकरच होणार्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौरविले जाणार असल्याची माहिती या फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी दिली आहे. दशावतारी लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांच्या संशोधनातून दशावतार लोककलेच्या डॉक्युमेंटरी व्हिडिओ पहिल्या श्रावण सोमवार चे औचित्य साधून युट्युब वर नुकताच प्रसारित केला असून दशावताराबद्दल विशेष माहिती देणारा हा व्हिडिओ रसिकांबरोबरच अभ्यासकांना विशेष मार्गदर्शन करणारा आहे. या डॉक्युमेंटरी साठी हेमंतकुमार कुलकर्णी, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी यासोबतच कमलेश खानोलकर, शार्दुल खानोलकर, तेजस खानोलकर, हिमांशू खानोलकर आणि गणेश खानोलकर यांनी विशेष सहकार्य केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)