ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत ८ ऑगस्टला बैठक..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत ८ ऑगस्टला बैठक..!</em>

प्रकाशन: 06 Aug 2022 08:09 PM
वाचन संख्या 39

उपस्थित राहण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन…!

कुडाळ | देवेंद्र गावडे :
शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक सोमवार दिनांक ८ ऑगस्टला २०२२ सायंकाळी ६.०० वाजता शिशु विकास हाॅल, शिरोडकर हायस्कूल परेल, मुंबई येथे आयोजित केली आहे.

सदर बैठकीत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख प्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, मीरा रोड, नालासोपारा आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमानी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहेत त्यांनी बैठकीला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक,व संजय पडते यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स