कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी संतोष नाईक.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी संतोष भिवा नाईक यांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे खजिनदार श्री. जितेंद्र पवार व सह सेक्रेटरी श्री. सुधीर पराडकर यांच्या मार्गदर्शनाने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रणव पेणकर यांनी निवड जाहीर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेमध्ये त्यांनी जिल्हाध्यक्ष या पदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळलेली आहे.
रिक्षा चालकांना योग्य न्याय मिळवून दिला होता, त्यांनी उत्तम कामगिरी बजावून रिक्षा संघटना वाढीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदान बद्दल त्यांच्याकडे कोकण विभाग कार्याध्यक्ष पदाची धुरा सुपूर्द करण्यात आली आहे. अत्यंत शांत, सुस्वभावी, मृदू भाषी, प्रशासकीय कौशल्य, उत्तम संघटन कौशल्य असलेले संतोष नाईक यांना हा बहुमान मिळाला आहे.
संतोष नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तसेच पाक्षिक स्टार वृत्त चे जिल्हा प्रतिनिधी आहेत. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालघर, ठाणा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक व टॅक्सी चालक तसेच विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)