मालवणचे सहिष्णू पंडित साधणार गराजलो रे गराजलो फेसबुक पेजवरुन लाईव्ह मुलाखत स्वरुपात संवाद..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सहसंपादक व वृत्तनिवेदक आहेत सहिष्णू पंडित.
उद्या २७ जुलैला संध्याकाळी ८ वाजता होणार लाईव्ह मुलाखत.
शिरगांव | संतोष साळसकर : महाराष्ट्रातील आघाडीच्या व मुंबई तसेच कोकण येथील श्री सोमेश्वर कलामंच या संस्थेच्या गराजलो रे गराजलो एक चळवळीच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्र (भाग २०७ ) मधे आपली सिंधू नगरी चॅनेल चे सहसंपादक व वृत्तनिवेदक सहिष्णू सुयोग पंडित यांची मुलाखत उद्या २७ जुलैला रात्री ८ वाजता गराजलो रे गराजलो फेसबुक वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुनाथ धर्णे हे घेणार आहेत.
आपली सिंधू नगरी चॅनेल चे सहिष्णू पंडित हे सहसंपादक आणि वृतनिवेदक आहेत. सहिष्णू पंडित यांच्या अतिशय युवा वयातील प्रसारमाध्यम क्षेत्रातल्या कामामुळे त्यांना या मंचावर आमंत्रित केले गेले असल्याचे सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष व गराजलो रे गराजलोचे प्रणेते श्री सहदेव धर्णे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
कोकणी माणसाचा विकास व भूमीपुत्राला मार्गदर्शन असे दोन महत्वाचे मुद्दे घेऊन श्री सोमेश्वर कलामंच व गराजलो रे गराजलो ही नाट्य चळवळ मुंबई व कोकणात गेली तीन वर्षे अथक कार्यरत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)