'सिंधदुर्ग' चे दरवाजे पर्यटकांसाठी उघडणार?
अद्याप पुरातत्व विभागाकडून सुधारित आदेश नाहीत
मालवण | वैभव माणगांवकर : दरवर्षी १ सप्टेंबरपासून ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पर्यटनास प्रारंभ होतो. मात्र, यंदा १ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू होणार का, याविषयी शंका कायम आहे. कारण भारतीय पुरातत्व विभागाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात केलेल्या किल्ला पर्यटन बंदीच्या सूचना अद्याप कायम आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जलप्रवासी वाहतुकीबाबत स्पष्ट आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यावेळी भारतीय पुरातत्व विभागाने आपल्या राज्यातील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. परंतू पुढील आदेश येईपर्यंत या पर्यटन बंदीचे आदेश कायम राहणार आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत जर पुरातत्व विभागाकडून किल्ले पर्यटकांसाठी khule करण्याबाबतच्या लेखी सूचना मिळाल्या, तर १ सप्टेंबर पासून नियमित कालावधी नुसार सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)