ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेरली ( ता- मालवण) येथील ५ महिन्याच्या बालकाला लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थीक मदतीची गरज
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेरली ( ता- मालवण) येथील ५ महिन्याच्या बालकाला लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थीक मदतीची गरज

प्रकाशन: 23 Jul 2022 02:20 PM
वाचन संख्या 95

या शस्त्रक्रियेसाठी १६,५००००/- लाखाची खर्च अपेक्षित आहे.

दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन

शिरगांव / संतोष साळसकर: मालवण तालुक्यातील वेरली – सडेवाडी येथील रहिवाशी, कु. हृदया आशिष चव्हाण वय ५ महिने ही तान्हुली यकृताच्या बिलीरी एटरेसिया या आजाराने त्रस्त आहे. तिच्या यकृतावर नानावटी हॉस्पिटल, विले पार्ले मुंबई येथे, १६,५०,०००/- (साडेसोळालाखाची) शस्त्रकिया केल्यास मुलगी पुर्ण बरी होणार. या शस्त्रक्रिये साठी आर्थिक मदतीची त्वरित गरज आहे. या सहकार्या शिवाय, कु. ह्रदयाचे आईवडील सौ. श्री अंतरा आशिष चव्हाण यांच्याकडे पर्याय नाही. या कुटुंबाला समाजातील जास्तीत जास्त दानशुरांनी तसेच विविध सामाजिक संस्थांनी आर्थिक सहकार्याचा हात पुढे केल्यास या ५ महिन्याच्या बाळाला जीवदान मिळू शकेल.या आपल्या लहान मुलीसाठी तिचे वडील हे स्वतः आपल्या यकृताचा काही भाग आपल्या मुलीसाठी दान करणार आहेत. मात्र त्यासाठी १६,५०००० रू. एवढा मोठा खर्च होणार आहे. एव्हढा मोठा खर्च करण्यासाठी या आईवडिलांकडे एव्हढा पैसा नाही तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी, विविध सामाजिक संस्थांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा असे या मुलीच्या आईवडिलांनी, समस्त चव्हाण कुटुंबीयांनी आवाहन केले आहे. “बिलीरी एटरेसिया” म्हणजेच पित्त विषयक हा आजार आहे. पहिला उपाय म्हणुन कसाई सर्जरी डॉक्टरांच्या सल्ल्याने ९ मे रोजी करण्यात आली. तरीपण तिला वारंवार इन्फेक्शन होत आहे. तिच्या वयाच्या प्रमाणे तिचे वजनही वाढत नाही. लिव्हर बायोसीचा रिपोर्ट पाहता डॉक्टरांचे म्हणणे आहे, की तिला लिव्हर ट्रान्सप्लांट ची गरज आहे. लिव्हर ट्रान्सफरंटच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणता १६५००००/- लाख रुपये खर्च आहे. एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी चव्हाण कुटुंब असक्षम आहे. आता या बाळाचे जगणे केवळ आपल्या सारख्या दानशुरांच्या हातात आहे. तरी आपण पुढील दिलेल्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी अशी विनंती मुलीचे आईवडील श्री./सौ. अंतरा आशिष चव्हाण यांनी या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.आशिष चंद्रकांत चव्हाण यांच्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिय Central Bank of India A/c No – 3747452174IFSC Code – CBIN0280603 Google Pay Ashish 9769598180 UPI ID- ashishchavan833-1@okaxisName – Ashish Chandrakant Chavan.यावर रक्कम जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स